नवी दिल्ली- भारतीय रेल्वे प्रवाश्यांच्या सोयीसाठी नवनवीन सुविधा पुरवीत आहे. मात्र काही प्रवासी हे रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करतात. सुशिक्षित प्रवासी देखील रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करतात. रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या श्रीमंत श्रेणीतील प्रवाश्यांनी वर्षभरात १४ कोटींची चादर, उशी चोरून नेली आहे.
मागील आर्थिक वर्षात देशभरातून एसी कोचमधून जवळपास २१ लाख ७२ हजार २४६ साहित्य चोरीला गेले आहे. ज्यात १२ लाख ८३ हजार ४१५ तौलीया, ४ लाख ७१ हजार ०७७ चादर आणि ३ लाख १४ हजार ९५२ ८५२ उशी इतके साहित्य चोरीला गेले आहे. तसेच स्वच्छता गृहातील साहित्यांची देखील चोरी करण्यात आलेली आहे.