पुणे । पुणे रेल्वे स्थानकातून काढलेला पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई मासिक पास व ठाणे, मुंबईकडील रेल्वे स्थानकांतून काढलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-पुणे हा मासिक पास 615 रुपयांना मिळतो. दोन्ही पासांवर दर्शविलेले अंतरही 192 किलोमीटर एवढेच आहे. या पासेसमध्ये एकच तफावत आहे, ती अशी की, मुंबई दिशेकडील काढलेल्या मासिक पासावर 1ठढ असे लिहिलेले असते आणि पुणे रेल्वे स्थानकात काढलेल्या मासिक पासावर तख-घधछ असे लिहिलेले असते. त्यामुळे तख-घधछ, असे लिहिलेल्या मासिक पासधारकांना मुंबई-पुणे हा प्रवास पनवेल मार्गे करायचा असेल किंवा या मार्गावरून जाणार्या गाडीने प्रवास केल्यास मेल एक्सप्रेस गाड्यांमधील तिकिट तपासनीस सामान्य व पासधारक डब्यात बसून देत नाहीत. तसेच या पनवेल मार्गे जाणार्या गाडीत बसल्यास अपमानित करून विनातिकिट प्रवास करत असल्याची पावती फाडेल, अशी धमकी देखील दिली जात आहे.
पुणे-मुंबईचे दैनंदिन प्रवासी नाराज
रेल्वे प्रशासनातील काही तांत्रिक त्रुटींमुळे अनेक रेल्वे प्रवाशांना मानसिक त्रासास सामोरे जावे लागले. तसेच आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. पुणे-मुंबई दैनंदिन प्रवास करणारे मासिक पासधारक नाराज झाले आहेत. याबाबत कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे म्हणाले, तख- घधछ लिहिलेले आहे म्हणून पनवेल मार्गे प्रवास करू शकत नाही, असे बोल सुनावले जातात. तर याउलट 1ठढ असे लिहिलेल्या पासधारकांस प्रामाणिकपणे बसू दिले जाते. 1ठढ असे लिहिलेल्या मासिक पासधारकांना बसू देण्यासंदर्भात वाद नाही. पुणे रेल्वे स्थानकातून मासिक पास काढणार्या पुणेकर रेल्वे प्रवाशांनी मासिक पासवर 1ठढ असे लिहून पास द्यावा. अशी मागणी बुकींग क्लार्ककडे केल्यावर येथील बुकिंग क्लार्क पुणे रेल्वे स्थानकातील संगणकात 1ठढ असे लिहिण्याची सुविधाच उपलब्ध केलेली नाही, असे उत्तर देऊन पासधारकांची बोळवण करत असतात.
सर्वच डब्यातून प्रवास करू द्यावा
पुणे रेल्वे स्थानकातील संगणकीय वा तांत्रिक त्रुटीमुळे अनेक पुणेकर रेल्वे प्रवाशांना मासिक पास काढूनही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी, पुणे रेल्वे प्रशासनाने व मध्य रेल्वे प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करून पुणे मुंबई दैनंदिन प्रवास करणार्या समस्त पुणेकर रेल्वे प्रवाशांना मासिक पासावर व्हाया पनवेल व व्हाया कल्याण मार्गावरील सर्वच मेल एक्सप्रेस गाड्यांमधील सामान्य व पासधारक डब्यातून प्रवास करू द्यावा.
कारण, पुणे, लोणावळा व खंडाळा दिशेकडे जाण्याकरता उपनगरीय लोकल सेवेप्रमाणे वाहतूकसेवा नसल्याने केवळ मेल एक्सप्रेस गाड्यांमधूनच प्रवास करावा लागत आहे. या बाबीकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन निराकरण करावे. अन्यथा भविष्यात क्षुल्लक कारणामुळे पुणेकर रेल्वे प्रवाशांचा रोष ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही प्रभाकर गंगावणे म्हणाले.