भुसावळ। रेल्वेच्या ज्युनिअर इन्स्टिट्युट इमारतीचे नुतनीकरणाचे उद्घाटन गुरुवार 15 रोेजी मंडळ रेल प्रबंधक आर.के. यादव यांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता करण्यात आले. कार्यक्रमास मंडळ सचिव इब्राहिम खान, मंडळ अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, वरिष्ठ कार्मिक अधिकारी डॉ. तुशाबा शिंदे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ज्युनिअर इन्स्टिट्युटच्या कमिटीतर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
एनआरएमयुतर्फे करण्यात आला पाठपुरावा
मध्य रेल्वेचे ज्युनिअर इन्स्टिट्युट हे 100 वर्षे जुने आहे. इन्स्टिट्युटमध्ये रेल्वे कामगार व त्यांचे सदस्य मनोरंजन व खेळण्याकरीता येतात. एनआरएमयुचे व ज्युनिअर इन्स्टिट्युटच्या पदाधिकार्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मंडळ रेल प्रबंधक यादव यांनी एनआरएमयुचे सामाजिक व उत्तम कार्याबद्दल कौतुक केले. मानद सचिव अजमल खान यांनी आभार मानले. आर.एम. सिंग, अफसर खान, गायकवाड, मंडळ कोषाध्यक्ष टी.आर. पांडव, रवी चौधरी, युवराज इंगळे, रुपसिंग पाटील, दिपक सुर्यवंशी, जयसिंग महाजन, वसंत पथराड, राजकुमार गवळी, संजय गौतम, प्रमोद भारंबे, ललित भारंबे, नरेंद्र कटुरवार, ए.टी. खंबायत, इसरार, श्याम तळेकर, राजेश तायडे, डी.के. गजभिये, रविंद्र कोळी, ए.एस. पाटील, ए.पी. धांडे यांनी परिश्रम घेतले.