रेल्वेच्या डब्यातून धुर

0

भुसावळ । मुंबई लोकमान्य टिळक टर्मीनसहून फैजाबादला जाणार्‍या सुपरफास्ट एक्सप्रेसच्या डब्यातून धुर निघत असल्याचे शहरातील दगडी पुलावर उघडकीस आल्यामुळे थोडा वेळ प्रचंड धावपळ उडाली. पायदानाखाली असलेल्या व्हीलच्या डायनामो बेल्टमधून अचानक धूर यायला सुरुवात होऊन त्याला आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. यानंतर गाडी थांबविण्यात येऊन कर्मचार्‍यांनी आग विझवल्यानंतर गाडी पुढे रवाना झाली.

नेमके काय घडले
दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास 22103 डाऊन म्हणजेच मुंबई लोकमान्य टिळक टर्मीनस ते फैजाबाद सुपरफास्ट एक्सप्रेसच्या साधारण डब्यातील डायनामो बेल्टमधून अचानक धूर निघाला त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. भुसावळ स्थानकात येण्याआधी रेल्वे दगडी पूलाजवळ चालक गाडीला ब्रेक लावत असता या गाडीच्या जनरल बोगीच्या पायदानाखाली असलेल्या डायनामो बेल्टमधून अचानक धूर यायला सुरुवात झाली.त्यानंतर त्याला आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. यामुळे गाडी तातडीने थांबविण्यात आली. ही घटना चालक व गार्ड यांनी तातडीने वरिष्ठाना कळविली. त्यामुळे भुसावळ स्थानकातून तातडीने संबंधित विभागाचे अधिकारी धावून आले. यानंतर ही अडचण दुर केल्यानंतर गाडी पुढे रवाना करण्यात आली.