रेल्वेच्या तांत्रिक कामांमुळे भुसावळ-मुंबई पॅसेंजर चार दिवस रद्द

0

ईगतपुरीनजीक पॉवर ब्लॉक : गोदावरी एक्सप्रेसही तीन दिवस रद्द

भुसावळ- ईगतपुरी यार्डमध्ये रीमोल्डींग कामांमुळे पॉवर व सिग्नल ब्लॉक चार दिवसांसाठी घेण्यात आला असून डाऊन 12117 एलटीटी-मनमाड व अप 12118 मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस 19 ते 21 ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसांसाठी तर अप 51154 भुसावळ-मुंबई व डाऊन 51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर 18 ते 21 दरम्यान चार दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ऐन सण-उत्सवाच्या काळात गाड्या रद्द करण्यात आल्याचे प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत.

हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल
गाडी क्रमांक 11025 अप भुसावळ-पुणे तसेच 11026 डाऊन पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गातदेखील 19 ते 21 दरम्यान बदल करण्यात आला आहे. या काळात ही गाडी मनमाड, दौंडवरून पुण्याला जाईल तर परतीच्या प्रवासातही ही गाडी दौंड, मनमाडहून भुसावळपर्यंत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.