रेल्वेच्या तोट्यात 500 कोटींची वाढ

0

नवी दिल्ली । आधीच प्रवासभाड्याने आणि डायनामिक फेअर, प्रिमियम तत्काल सारख्या प्रकाराने त्रस्त झालेल्या प्रवाशांच्या खिशाला आणखी भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. वाढत्या तोट्यामुळे रेल्वे प्रवासी भाडे वाढवले जाऊ शकते. रेल्वे मंत्रालयाकडून नुकताच दिलेल्या निवेदनानुसार रेल्वेच्या तोट्यात 500 कोटींनी वाढ झाली आहे. सोबतच मोफत विमा दिल्याने रेल्वेला अतिरिक्त 40 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

रेल्वे मंत्रालयानी दिलेल्या माहितीनुसार, सध्या रेल्वे तोट्यात आहे. तो तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी अर्थ मंत्रालयाशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला गेला आहे. रेल्वे आरक्षणावेळी सेवाशुल्क सध्या आकारण्यात येत नाही. हेही वाढत्या तोट्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे सेवाकरारहित योजनेचा कालावधी 30 जूनपयर्यंत वाढवला आहे. जर अर्थ मंत्रालय अजूनही ही योजना वाढवण्याचा विचार करत असेल तर रेल्वेचा तोटा भरून काढण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज असल्याचे रेल्वे मंत्रालयातील अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

सध्या रेल्वेचा 70 टक्के तोटा कमी होईल, अशा प्रकारचे निर्णय घेण्याची गरज असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. सेवाकरारहित योजनेपूर्वी आयआरसीटीसीच्या एसी श्रेणीच्या तिकिटावर 40 रुपये तर नॉन एसी प्रति तिकिटावर 20 रुपये घेण्यात येत असत. परंतु, आता सेवाशूल्क आकारले जात नाही. रेल्वेच्या मते तिकिटावर लावण्यात येणार्‍या सेवा करामुळे महसुलात चांगली वाढ झाली होती. रेल्वेने 2015-16 मध्ये सेवाकरातून 256 कोटी रुपये तर 2014-15 मध्ये 256 कोटी रुपयांची कमाई केली होती.