रेल्वेच्या धडकेत आंदलवाडीच्या इसमाचा मृत्यू

0

निंभोरा- शौचाला जात असताना अज्ञात रेल्वेचा फटका बसल्याने आंदलवाडी येथील ईसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे पावणेपाच वाजता घडली. अशोक वसंत तायडे (35) असे मयत ईसमाचे नाव आहे. याबाबत निंभोरा पोलिसात बाळकृष्ण हरी तायडे (रा.आंदलवाडी) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद कर्‍यात आली.
आंदलवाडी गावाजवळ पहाटेच्या वेळी अशोक तायडे हे शौचाला जात असताना अज्ञात रेल्वेचा त्यांना फटका बसला. तपास जमादार समीर तडवी करीत आहेत.