चिंचवड : मुंबईच्या दिशेने जाणार्या चेन्नई एक्सप्रेसचा जोरदार धक्का लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चिंचवड येथे आनंदनगर झोपडपट्टीजवळ रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. प्रकाश भाऊ कांबळे (वय 18) असे या तरुणाचे नाव आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेने जाणा-या चेन्नई एक्सप्रेसचा जोरदार धक्का लागल्याने प्रकाश खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती प्रकाशच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र तो रेल्वेमार्गाजवळ कशासाठी गेला होता हे कळू शकले नाही. उशीर झाला तरी प्रकाश घरी आला नाही म्हणून त्याचा कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता हा प्रकार उघडकीस आला.nप्रकाशचे वडील मोलमजुरी करुन घर चालवातात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तरुण मुलगा अपघातात गेल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.