रेल्वेच्या धडकेत वाल्मिक नगरातील प्रौढाचा मृत्यू

0

जळगाव। धावत्या रेल्वेची धडक बसल्याने वाल्मीक नगरातील 52 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना हरिविठ्ठलनगर परिसरातील डाऊन रेल्वे लाईनवर घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाल्मीक नगर येथील रहिवासी अशोक सुकलाल अहिरे (वय-52) यांचा मृतदेह हरिविठ्ठल नगर परिसरातील डाऊन रेल्वे लाईनवरील खांबा क्रं.145/19 दरम्यान आढळुन आला. दरम्यान, धावत्या रेल्वेची धडकेत त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मृतदेहावर जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.