भुसावळ। देशाच्या विकासामध्ये प्रमुख भुमिका रेल्वेने कायम बजावली आहे. रेल्वे देशाचा मानबिंदू असून या रेल्वेला कायम अग्रस्थानी नेण्याचे कार्य रेल्वे कर्मचारी मोठ्या निष्ठेने करीत आहे. रेल्वे कर्मचार्यांच्या कार्याचा रेल्वेला अभिमान वाटतो असे प्रतिपादन भुसावळ विभागाचे रेल्वे मंडळ प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता यांनी केले. 62 व्या रेल्वे सप्ताहानिमित्त येथील श्रीकृष्णचंद्र सभागृहात रेल्वे कर्मचार्यांना पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भुसावळ मंडळातील विविध विभागातील 519 कर्मचार्यांचा मंडळ रेल प्रबंधक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला तर 30 महाप्रबंधक पुरस्कार प्राप्त कर्मचार्यांमध्ये कर्षण विभागाचे वरिष्ठ मंडळ अभियंता अजय टेकाडे, अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ मंडळ अभियंता (पूर्व) अनिल हिवाळे, सहाय्यक मंडळ विभागीय अभियंता (पीआरओ) संदीप कुमार, वरिष्ठ मंडळ अभियंता (विद्युत सामान्य) प्रदिप ओक या 4 राजपत्रित अधिकार्यांसह 26 कर्मचार्यांना सन्मानित करण्यात आले.
यांत्रिक माल दक्षता शिल्ड, ‘ए’ क्लास एआरटी शिल्ड, यांत्रिक शिल्ड तर संयुक्तरित्या लेखा (भुसावळ व सोलापूर मंडळ), कार्मिक (सोलापूर व भुसावळ), भंडार (मुंबई व भुसावळ मंडळ), ट्रॅक मशिन कार्य प्रदर्शन शिल्ड (भुसावळ व नागपूर मंडळ) या मिळालेल्या आंतरविभागीय दक्षता शिल्ड 2017 चा गौरवपूर्ण उल्लेख करुन मंडळ रेल प्रबंधक गुप्ता म्हणाले की, रेल्वेच्या विकासात कर्मचार्यांचाही विकास समाविष्ट असून रेल्वेचा विकास कसा साधता येईल याकडे लक्ष देऊन निष्ठेने कार्य करीत रहावे. आपल्या देशाचा गौरव वाढविणे हि जबाबदारी आपली असली पाहिजे असेही गुप्ता म्हणाले.
यांना मिळाला पुरस्कार
गुप्ता यांनी भुसावळ विभागातील महाप्रबंधक पुरस्कार प्राप्त मनिष इंगोले (कार्मिक विभाग), जयश्री पुणतांबेकर (वित्त व लेखा विभाग), विनय ओझा, पराग चौधरी (वाणिज्य विभाग), दामोदर सोनी (विद्युत), नितीन पाटील (विद्युत टीआरएस), सुनिल हिवाळे, राजु साहेबराव, देशराज सिंग सिताराम, दुर्गेश ठाकूर, रामनिवास, मनिष कदम (अभियांत्रिकी विभाग), सुनिल जगताप, आशिष चौधरी (यांत्रिक विभाग), मनोज सोनटक्के, प्रमोद हिवरकर, विकासकुमार, बबिता गायकवाड, आर.एस. पाठक (परिचालन विभाग), विनोदकुमार लांजिवार, मो. आरिफ सिद्दीकी (सुरक्षा), दीपक मौर्य, भुषण जंगले (संकेत तथा दूरसंचार विभाग), मुरली एन. नायर (सामान्य प्रशासन) तसेच सतिष कुलकर्णी, विवेक मिश्रा यांसह 519 कर्मचार्यांना व स्काऊट आणि गाइडच्या 4 जणांना मंडळ रेल प्रबंधक पुरस्कार देऊन गुप्ता यांनी सन्मानित केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी एडीआरएम अरुण धार्मिक, वरिष्ठ मंडळ कार्मिक प्रबंधक डॉ. तुषाबा शिंदे, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनिल मिश्रा, वरिष्ठ मंडळ अभियंता ए.एम. टेकाडे, वरिष्ठ मंडळ वित्त अधिकारी विजय कदम, वरिष्ठ मंडळ अभियंता एस.एस. चव्हाण, वरिष्ठ मंडळ अभियंता मनोज सोनी, वरिष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता दिनेशकुमार गजभिये, विभागीय मंडळ सामग्री प्रबंधक राजेश पाटील, मंडळ चिकीत्सा अधिकारी डॉ. राकेश पंचरत्न, वरिष्ठ मंडळ परिचालन अभियंता नरपतसिंग यांसह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.