भुसावळ। येथील रेल्वे स्थानकावरील प्रवासी निवार्यात एक 3 ते 4 महिन्यांचे पुरुष जातीचे नवजात बालक बुधवार 2 रोजी आढळून आले. याप्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलीसांनी बालकास ताब्यात घेतले आहे.
रेल्वे स्थानकावरील दक्षिण बाजूने मुख्य बुकींग ऑफीस जवळ कुणीतरी अज्ञात स्त्रीने अनैतिक संबंधातून जन्मलेले 3 ते 4 महिन्याचे पुरुष जातीचे बालक सोडून दिलेले आढळून आले. यासंदर्भात हेड कॉन्स्टेबल मंगेश बोरसे यांच्या माहितीवरुन रेल्वे लोहमार्ग पोलीस स्थानकात अज्ञात मातेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती असल्यास लोहमार्ग पोलीस स्थानकात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.