रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर कारवाईची संक्रांत

0

जंक्शनमध्ये 303 प्रवाशांवर कारवाईचा दंडुका ; दिड लाखांचा दंड वसुल

भुसावळ- रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांसह नियम मोडणार्‍या प्रवाशांवर रेल्वेने कारवाईचा दंडुका उगारला असून सातत्याने सुरू असलेल्या मोहिमेत सोमवारी जंक्शन स्थानकावर झालेल्या कारवाईदरम्यान 303 प्रवाशांकडून एक लाख 54 हजार 380 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सहाय्यक वाणिज्य प्रबधंक (कोचिंग) श्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबवण्यात आली.

31 तिकीट निरीक्षकांची धडक मोहिम
31 तिकीट निरीक्षकांसह रेल्वे सुरक्षा बलाच्या सहा कर्मचार्‍यांनी सोबत घेत सोमवारी दिवसभरात विना तिकीट प्रवास करणार्‍या 101 प्रवाशांकडून 51 हजार 900 रुपयांचा दंड तर रीझर्व्ह डब्यातून साध्या तिकीटावर प्रवास करणार्‍या 198 प्रवाशांकडून एक लाख 730 तसेच सामानाचे बुकींग न करताच वाहतूक करणार्‍या चार प्रवाशांकडून एक हजार 750 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. धडक मोहिमेत तिकीट चेकिंग स्टाफचे एन.पी. पवार, एस.एम.पुराणिक, शेख जावेद, वी.के.भंगाळे, वाय.डी.पाठक, व्हिवेन रॉड्रिक्स, प्रशांत ठाकुर, एस.ए.दहिभाते, उमेश कलोसे, एस.पी.मालपुरे, पी.एम.पाटील, आर.पी.सरोदे,एल.आर.स्वामी, ए.के.गुप्ता, ए.एम.खान, अनिल खर्चे, अजय बच्छाव, निलेश पवार, ए.एस.राजपूत, निलेश पवार, जी.एस.शुक्ला, शेख अल्ताफ, आल्विन गायकवाड, बी.एस.महाजन व तिकीट कर्मचारी सहभागी झाले.