रेल्वेतील चोर्‍या रोखण्यासाठी विशेष कृतिदल कार्यरत

0

अलिबाग । कोकण रेल्वे मार्गावरील वाढत्या चोर्‍या रोखण्याण्यासाठी विशेष कृतीहल स्थापन करण्यात आले असून अनधिकृत फिरत्या विक्रेत्यांविरोधात ही जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. आता पर्यंत 51 फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 21 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोरट्यांना तसेच फिरत्या विक्रत्यांना आळा बसणार आहे. कोलाड, माणगाव, विर, चिपळूण खेड स्थानकादरम्यान मोठ्या प्रमाणावर चोर्‍यांचे प्रकार झाले असून अनधिकृत विक्रत्यांवरही मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. हे लक्षात घेऊन रेल्वेचे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक तसेच कोकण रेल्वेचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त यांच्या आदेशानुसार स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. विषेश गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर धावणार्‍या रेल्वे गाड्या आणि प्रवाशांची वाढती समस्या लक्षात घेऊन सुरक्षा उपाय अधिक सक्षम करण्यात आले आहे.