नवी दिल्ली: रेल्वेतर्फे करण्यात येणाऱ्या कर्मचारी भरतीतील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील अशी घोषणा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली. आगामी काळात रेल्वेत भरती केल्या जाणाऱ्या जागांपैकी ९ हजार जागा महिलांसाठी राखीव असणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. यात कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक पदाचा समावेश आहे.
रेल्वेत मोठ्या प्रमाणात पदभरती केली जात आहे. त्यात महिलांसाठी निश्चित जागा राखीव ठेवावी अशी मागणी होत होती. त्याअनुषंगाने हे निर्णय घेण्यात आले आहे. महिलांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.