चाळीसगाव – चाळीसगाव रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतुन पडल्याने येथील पवार वाडीतील ४२ वर्षीय ईसमाचा मृत्यू झाल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री ८-५५ वाजेच्या सुमारास घडली असुन चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी, प्रभाकर प्रल्हाद नागणे (वय- ४२) रा. पवार वाडी चाळीसगाव ट्रक ड्रायव्हर हे २० नोव्हेंबर रोजी रात्री ८.५५ वाजता मुंबई हुन भुसावळ कडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेस मधुन चाळीसगाव डाउन रेल्वे स्टेशनवर ३२७/२५/२७ च्यामध्ये प्लॅटफॉर्म न २ वर पडल्याने जबर मार लागल्याने चिरडुन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रल्हाद नागणे हे मनमाड येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते तेथुन भुसावळ येथे चुलत बहीणीकडे जात असतांना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर पडुन मृत्यू झाला त्यांच्यावर आज दुपारी १ वाजता पाचोरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परीवार आहे. याप्रकरणी रेल्वे स्टेशन मास्टर प्रदीपकुमार यादव चाळीसगाव रेल्वे स्टेशन यांच्या खबरीवरुन चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन तपास पोहेकॉ पी.एस.राणे करीत आहेत.