रेल्वेतून ढकलून देत तृतीयपंथियावर चाकू हल्ला !

0

जळगाव । जळगाव शहराच्या अलीकडे रेल्वे थांबली असतांना चौघा तरुणांनी बोगीतून तृतियपंथियाला खालू ढकलून त्यास दुध फेडरेशनच्या परिसरात बेदम मारहाण करीत पायावर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना काल रविवारी दुपारी घडली. अमळनेर येथिल तरुणांनी हल्ला करुनही आपली फिर्याद देखिल पोलिसांनी घेतली नसली नसल्याचा आरोप या जखमी तृतियपंथियाने आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पत्रकारांशी बोलतांना केला. संजना खुशी जाल ( वय 40 रा.जळगाव) असे जखमी तृतीयपंथियाचे नाव आहे. हल्ला झाल्यानतंर त्याला त्याच्या सहकार्‍यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिस फिर्याद घेत नसल्याने जखमीसह त्याच्या सहकार्‍यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता.

तरूणांशी झाला वाद
जखमी संजना यांनी सांगीतले की, रविवारी दुपारी ताप्तीगंगा एक्सप्रेसमध्ये नेहमीप्रमाणे प्रवास करीत असतांना पैसे मागण्यावरुन त्यांचा अमळनेर येथिल तरुणांशी वाद झाला. रेल्वे जळगाव स्थानकाच्या अलीकडे आऊटरजवळ थांबलेली असतांना या चौघा तरुणांनी त्यांना रेल्वेच्या बोगीतून खाली ढकलले. चौघे तरुण देखिल त्याच्यापाठोपाठ खाली उतरले त्यांनी त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली चौघांकडे देखिल चाकूसारखे धारदार शस्त्रे होती.

चाकू हल्ल्यात पायाला दुखापत
बेदम मारहाण करीत असतांना चौघांपैकी एका तरुणाने त्याच्या पोटावर चाकूहल्ला केला. यावेळी त्यांनी प्रतिकार केल्याने वार त्यांच्या पायावर लागला. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत हल्लेखोरांनी तेथून पोबारा केल्याचे जखमी संजना यांनी सांगीतले. यानतंर जखमी अवस्थेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या पायावर चाकू हल्ल्याने झालेल्या जखमेला 9 टाके घालण्यात आले. घटनेनतंर आज सोमवारपर्यंत देखिल त्यांचा पोलिसांकडून जबाब घेण्यात आलेला नाही.

तक्रार घेण्यास टाळाटाळ
तसेच घटनेची माहीती तालुका पोलिसात त्यांच्या सहकार्‍यांनी देवनू देखिल त्यांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप संजना जाल यांनी केला आहे. जखमी संजना जाल यांना पाहण्यासाठी आज सोमवारी शहरातील अनेक तृतियपंथी जमले होते. यापूर्वी देखिल मेहंदी नावाच्या एका तृतीयपंथियास मारहाण केली होती. असे असतांनाही पोलिस दखल घेत नसल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.