रेल्वेतून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

चाळीसगाव । मध्य प्रदेश येथून शिर्डी येथे रेल्वे ने प्रवास करणार्‍या 23 वर्षीय तरुण तालुक्यातील खडकी बु गावाजवळ 2 जून 2017 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेतून पडल्याने गंभीर अवस्थेत त्यास धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असतांना साक्ली 10:20 वाजता त्याचा मृत्यू झाला असून धुळे येथून कागदपत्र आल्याने आज दि 3 जून रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशात लग्नासाठी गेला होता
वसीम कय्युम पठाण (23, रा. पानमळा शिर्डी ता. राहता जि. अहमदनगर) हा तरुण लग्न समारंभासाठी मध्य प्रदेश येथे गेला होता. मध्य प्रदेश येथून शिर्डी येथे घराकडे रेल्वेने परतत असतांना 2 जून 2017 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु॥ गावाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याचे वर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून धुळे येथे हिरे मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. दि 2 रोजी सकाळी 10:20 वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. धुळे येथून कागदपत्र प्राप्त झाल्याने आज शनिवार 3 जून रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला शाहदाब कायम पठाण (21) याचे खबरीवरून 37/2017 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार गजरे करीत आहे.