वरणगाव- येथून जवळच असलेल्या आचेगाव शिवारात नागपूरकडे जाणार्या डाऊन रेल्वे लाईनवर कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, 16 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आचेगाव शिवारात नागपूरकडे जाणार्या डाऊन रेल्वे लाईनवर खांबा क्रंमाक 463/4 ते 6 मध्ये कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. याबाबत आचेगाव उपस्टेशन प्रबंधक शव कुमार यांनी दिलेल्या खबरीनुसार वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.