जळगाव । मुंबईकडून मध्यप्रदेशला घरी जात असतांना 14 एप्रिल रोजी नशिराबाद उड्डाणपूलाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने 19 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस आले. खिश्यातील आधार कार्डच्या सहाय्याने ओळख पटली असल्याने रेल्वे पोलिसांनी सांगितले, नशिराबाद पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप धनाजी इवने (वय-19) रा. मांजरी पो. इटवा ता.मुलताई जि. बैतूल म.प्र. हा मुंबईकडून गावाकडे जात असतांना धावत्या रेल्वेतून नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ पडल्याने जखमी अवस्थेत मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषीत केले. खिश्यातून आधार कार्ड मिळाल्याने मयताची ओळख पटली. जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.