चाळीसगाव । चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रावसाहेब चव्हाण यांचा 8 एप्रिल रोजी रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान चाळीसगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ रेल्वे गणेश कॉलनी जवळ धावत्या रेल्वेतून पडुन मृत्यू झाला. त्यांच्या या मृत्यू बाबत चाळीसगाव रेल्वे स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांचेवर येथील खरजई रोड स्थित स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार
रतन विक्रम चव्हाण यांचे चिरंजीव व कृउबा समितीचे माजी सभापती रमेश विक्रम चव्हाण व नगर परिषदच्या विद्यमान उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांचा पुतण्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रावसाहेब रतन चव्हाण (25 रा. घाट रोड रामवाडी चाळीसगाव) यांचे 8 एप्रिल 2017 रोजी रात्री 12 ते 1 वाजेदरम्यान चाळीसगाव रेल्वे स्टेशन जवळील अप रेल्वे रुळावर किमी खांबा क्रमांक 326/21/22 च्या मध्ये रेल्वे गणेश कॉलनी जवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने डोक्याला व इतर ठिकाणी जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वेस्टेशन मास्तर यांनी खबर दिल्यावरुन चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावेळी राजकीय, सामाजीक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.