सिमकार्डच्या आधारे पटली ओळख
जळगाव । मित्रांच्या लग्नासाठी रेल्वेने नाशिकहून जळगावकडे येत असतांना म्हसावद जवळील माहिजी येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेने पडल्याने नाशिकच्या 30 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला असून जळगाव रेल्वे चौकात तरूणाबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सुरूवातीला मयत तरूणाची ओळख पटली नव्हती मात्र रेल्वे पोलिस कर्मचारी अनिंद्र नगराळे यांनी मयतच्या सिमकार्डच्या आधारे नातेवाईकांशी संपर्क साधून मयतचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शब्बीर समशेरसिंग सय्यद (वय-30) रा.इंदिरानगर, जेल रोड नाशिक हा आपल्या मित्रांच्या लग्नासाठी नाशिकहून 6 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास रेल्वेने जाण्यासाठी बसला. म्हसावद येथील माहिजी रेल्वे स्थानकाजवळ 7 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास सुरूवातीला मयत शब्बीरचा मृतदेह अनोळखी असल्याचे स्टेशन मास्तर यांनी जळगाव रेल्वे पोलिसांना खबर दिल्यावरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
त्यानुसार रेल्वे पोलिस कर्मचारी अनिंद्र नगराळे यांनी मयतच्या खिश्यांची तपासणी केली असता सिमकार्डच्या आधारे मयतच्या नातेवाईकांची ओळख पटली. त्यानुसार मयत शब्बीर सैय्यदच्या नातेवाईकांना मृतदेह घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयात बोलविण्यात आले. सिमकार्ड कोणाच्या नावावर आहे यांची माहिती घेतल्यानंतर नाशिक येथील पत्ता आल्याने जळगाव रेल्वे पोलिसांनी नाशिक रोड पोलिसांची संपर्क साधुन मोबाईलवर फोटो पाटवून पत्त्याच्या आधारे घराच्या नातेवाईकांची माहिती मिळाली. मयत शब्बीर हा घरातील मोठा मुलगा असून परीवारात आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. रेल्वे पोलिस कर्मचारी श्री नगराळे यांच्या मदतीने शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.