रेल्वेतून पडल्याने यावलच्या तरुणाचा मृत्यू ; नांदुर्‍याजवळ दुर्घटना

0

यावल- बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा येथे पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. संतोष सुरेश भोई (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शनिवारी पत्नीला घेण्यासाठी सासरी गेला मात्र पत्नीला न घेता तो रविवारी एकटाच नांदुरा येथून निघाला मात्र दोन दिवसानंतरही घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो न सापडल्याने हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तपासादरम्यान सोमवारी सायंकाळी संतोषचा मृतदेह आढळून आला. रविवार, 18 रोजी नांदुरा परीसरामध्ये रेल्वे अपघातामध्ये एक जण जखमी अवस्थेत आढळल्यानंतर त्यास खामगाव येथे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने खामगाव येथून त्यास अकोला शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्यात आले मात्र संतोषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, मयत संतोष भोई हे हातमजुरी करून कुटुंबाचा रहाटगाडा ओढत होते. संतोषच्या पश्‍चात पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन वर्षाचा मुलगा असा परीवार आहे.