निंभोरा- कुठल्यातरी धावत्या गाडीतून पडल्याने 30 ते 35 वर्षीय अनोळखी रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुप9ारी साडेतीन वाजेपूर्वी घडली. या प्रकरणी निंभोरा रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रावेर-निंभोरा दरम्यान खिर्डी शिवारातील खांबा क्रमांक 473/25 ते 23 दरम्यान अनोळखी इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाल्यानंतर निंभोरा उपस्टेशन अधीक्षक यांनी निंभोरा पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एसएसआय भास्कर कुलकर्णी करीत आहेत.