रेल्वेतून पडून तरूण ठार

0

देहूरोड : देहूरोड ते आकुर्डी दरम्यान धावत्या रेल्वेमधून पडल्याने एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराला घडली. हा अपघात आकुर्डी रेल्वे स्टेशन किलोमीटर 117/26 येथे झाला आहे. लोणावळ्यावरून पुण्याकडे येणार्‍या रेल्वे मार्गावर ही घटना घडली आहे. तरूण खाली पडल्यानंतर थेट रेल्वेच्या चाकाखाली आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंची 6 फूट, निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, फुल बाह्यांचा टी शर्ट, गहूवर्णीय असे या तरुणाचे वर्णन आहे. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. पुढील तपास रेल्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक करदाळे हे करत आहेत.