जळगाव । बहिणीला भेटण्यासाठी नाशिकला जात असलेल्या तरूण रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यानात शिवाजीनगर रेल्वेलाईनवर घडली. यात तरूणाचा पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरूणाच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेत गर्दी केली होती. भुसावळ येथील गौसीय मस्जीदजवळ शेख शफीक अब्दूल गफ्फार हा तरूण कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. यासोबत मिस्तरी काम करतो. शेख शफीक हा सोमवारी सकाळी गोरखपुर-पनवेल रेल्वेतून नाशिक येथे वास्तव्यास असलेली सलमा बी शेख शकील या बहिणीला भेटण्यासाठी जात होता. सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास शेख शफीक हा अचानक धावत्या रेल्वेतून खाली पडला. यात त्याच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली तर दुसरे पाय फॅक्चर झाले. परिसरात रेल्वे कर्मचार्यांना तसेच नागरिकांना घटना कळताच त्यांनी शफीक याला 10 वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यानंतर घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी देखील जिल्हा सामान्यात रूग्णालयात धाव घेत एकच गर्दी केली होती.