भुसावळ- धावत्या रेल्वतून पडल्याने 25 ते 30 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास डाऊन साईडवर कपिल वस्तीनगरवळ घडली. नागपूरकडे जाणार्या डाऊन रेल्वे लाईन खांबा क्रमांक 452/14 व 16 च्या मध्ये अनोळखी युवक मयत अवस्थेत आढळला. शरीराने सडपातळ, रंगाने काळा-सावळा, डोक्यावर केस उचकटलेले, नाक सरळ, दाढी, डोळे अर्धवट उघडे, हातात लाल-पिवळ्या रंगाचे दोरे, अंगात निळ्या रंगाची पॅन्ट, आकाशी रंगाचे हाप बाहीचा टी शर्ट त्यावर श्री धनल्क्ष्मी बचत तथा ऋण सहकारी संस्था लि. असे लिहिलेले आहे. वरणगाव पोलिसात अकसमात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार संदीप बडगे करीत आहेत.