रेल्वेतून फेकल्या जुन्या नोटा

0

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली व दापोरा रेल्वे रूळांलगत जुन्या नोटांनी भरलेले पोते खाली फेकल्याने खळबळ उडाली आहे.

शिरसोली-दापोरा गावादरम्यान असलेल्या रेल्वे रुळालगत जुन्या नोटांनी भरलेले पोते धावत्या रेल्वेतून कुणीतरी फेकले. त्यामुळे रुळालगत नोटा अस्तव्यस्त पसरल्यामुळे खळबळ उडाली. या पोत्यामध्ये सुमारे दीड लाख रूपयांच्या जुन्या नोटा असल्याचे आढळून आले. या संदर्भात दापोरा येथील पोलिस पाटील जितेश गावंडे यांनी तालुका पोलिस स्थानकात या नोटा जमा केल्या. मात्र हा नेमका काय? याबाबत चर्चेला एकच उधाण आले आहे.