भुसावळ । हावडा-मुंबई दुरंतो एक्सप्रेसने प्रवास करणार्या बंगलोर येथील 30 वर्षीय तरुणीचा रेल्वेत झोपलेल्या अवस्थेत बांग्लादेशी तरुणाने विनयभंग केल्याची घटना शुक्रवार 7 रोजी रात्रीच्या सुमारास नागपूर-भुसावळ स्थानकादरम्यान घडली. याबाबत तरुणीने लागलीच रेल्वे पोलीसांना याबाबत माहिती देऊन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सीएसटीवरुन भुसावळ जीआरपीत गुन्हा वर्ग
बंगलोर येथील इजीपुरा भागातील 30 वर्षीय युवती हावडा-मुंबई दुरंतो एक्सप्रेसने कोच नं. बी. 6-22 वरुन प्रवास करीत असताना 7 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत मोहम्मद अय्युब मोहम्मद सुलेमान (वय 23) याने विनयभंग केला. याबाबत तरुणीने जीआरपी पोलीसांना तक्रार दिल्यानंतर या बांग्लादेशी तरुणास अटक करण्यात आली. याबाबत मुंबई सीएसटी येथील जीआरपी पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय राजू पवार करीत आहे.