रेल्वेत सुरु आहे असा घाणेरडा प्रकार!

0

नवी दिल्ली : एकीकडे सरकार बुलेट ट्रेनची तयारी करत आहे. सरकार रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेला अधिक महत्व देत आहे. मात्र दुसरीकडे रेल्वेचा गचाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेनमधील एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ट्रेनमधील कर्मचारी तेथील शौचालयामधील पाण्याने चहा बनवत असल्याचे दिसून येते.

सुरुवातीला हा व्हिडीओ खरा आहे की, नाही याबाबत बरीच चर्चा सुरु होती. पण आता रेल्वेकडूनच याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खरा असल्याचं समोर आलं आहे. रेल्वे याप्रकरणी वेंडरला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘याप्रकरणी वेंडिंग कंत्राटदार पी शिवप्रसाद याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.’ अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी एम उमाशंकर यांनी दिली.