रेल्वेमंत्र्यांचे धुळ्यात उत्साहात स्वागत

0

धुळे । केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु हे आज धुळे जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. नियोजित वेळेपेक्षा दोन तासांहून अधिक काळ उशिराने ते धुळ्यात दाखल झाले. गोंदूर विमानतळावर त्यांचे ना.डॉ.सुभाष भामरे, जळगावचे खासदार ए.टी.नाना पाटील, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ,नायब तहसिलदार मिलींद वाघ, जिल्हा प्रमुख बबन चौधरी, अनुप अग्रवाल, संभाजी पगारे, भिमसिंगदादा राजपूत, मनोहर भदाणे, मोहन सुर्यवंशी, अरविंद जाधव,किशोर संघवी, भाऊसाहेब देसले, अ‍ॅड.राहूल पाटील, राम भदाणे, हिरामण गवळी, बापू खलाणे, ओम खंडेलवाल, भारती माळी, वैशाली शिरसाठी, प्रतिभा चौधरी, रत्ना बडगुजर, उपस्थितीत विविध कार्यक्रम विद्या देसले, भिकनआप्पा वराडे, फिरोजलाला,सुरेश पाटील,गजेंद्र अंपळकर,प्रा.प्रदीप अडसुळ, पंकज अग्रवाल, शांताराम पाटील, शाम पाटील आदींनी स्वागत केले. यावेळी रेल्वेचे अधिकारी आर.के.यादव, व्हि.पी.जाट, नडपत सिंह आदीही हजर होते.

विकास साधण्यासाठी लोक सहभाग महत्वाचा
केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू पुढे म्हणाले की, सर्वसामान्य जनता विकास कामांसाठी सरकारला साकडे घालत असते. खर्‍या अर्थाने विकास साधण्यासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे याचे चांगले उदाहरण देशबंधू मंजूगुप्ता फाऊंडेशनच्या माध्यमातून पहायला मिळते. जिल्हा गरिबीमुक्त होण्याचा विडा उचललेल्या या फाऊंडेशनने ग्रामीण भागातील जनतेपर्यंत विविध उपक्रम पोहचविण्यासाठी सुरु केलेला पांझरा रेडिओ हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत या माध्यमातून विकास कामांना विकास यात्रेचे स्वरूप यायला वेळ लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भरगच्च कार्यक्रम
रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात मनमाड-इंदोर रेल्वेमार्गा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह रेल्वेमार्गासाठी प्रयत्न करणार्‍या धुळ्यातील प्रतिष्ठीत नागरीकांचाही सहभाग होता. रेल्वेमंत्र्यांसमवेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे, राज्याचे रोहयो मंत्री ना.जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे हे देखील यावेळी उपस्थित होते. दुपारी साक्रीरोडवरील एसआरपीएफ समारोहम हॉलमध्ये रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते कम्युनिटी रेडिओ केद्राचे उद्घाटन झाल्यानंतर पिंपळनेर परिसरात बांधण्यात आलेल्या चेक डॅमचा हस्तांतरण सोहळा झाला आहे.

रेल्वामंत्र्यांची आढावा बैठक
अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या इंदूर मनमाड रेल्वे मार्गाचे लवकरच भूमीपूजन करण्यात घेणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज धुळ्यात केली. आज या प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ना प्रभू बोलत होते . प्रभू पुढे म्हणाले की जनतेला केवळ खूष करण्यासाठी पुर्वी फक्त घोषणा व्हायच्या आताचे सरकार काम करते आणि मग बोलते मनमाड इंदूर मार्गाचा डीपीआर 3 जुलै रोजी तयार होऊंन रेल्वे बोर्डाला सादर झाला आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने आपली प्रक्रिया पूर्ण केली असून मध्य प्रदेश सरकारचे पत्र बाकी आहे यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा फायदा होईल 9 हजार कोटींचा हा रेल्वे मार्ग असून यासाठीं एकूण 3538 हेक्टर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे धुळ्याने देशाला खुप दिले पण धुळ्याला काही मिळत नव्हते तो अन्याय आता दूर होणार आहे. आता हा प्रकल्प स्वप्न राहणार नाही तर प्रत्यक्ष साकारणार आहे असेही प्रभू म्हणाले.

कम्युनिटी रेडिओ उपक्रमाचे कौतुक
गरीबीमुक्त, रोजगार युक्तसह महिला सशक्तीकरणाची विचारधारा घेऊन चालणार्‍या देशबंधू ण्ड मंजू गुप्ता फाऊंडेशनचा कम्युनिटी रेडिओचा उपक्रम कौतुकास पात्र असून तो अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केले.धुळे येथील एस. आर. पी. एफच्या समारोहम सभागृहात देशबंधू मंजूगुप्ता फाऊंडेशनतर्फे आयोजित रेडिओ पांझराचे उद्घाटन व पिंपळनेर परिसरात बांधण्यात आलेल्या 225 सिमेंट बंधार्‍यांच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. प्रभू बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, खासदार ए. टी. पाटील, खासदार डॉ. हीना गावित, आमदार अमरिश पटेल, आमदार डी. एस. अहिरे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्यासह विविध बचत गटाच्या महिला, शेतकरी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नव्या रेल्वे गाड्यांची मागणी
आढावा बैठकित खासदार ए टी नाना पाटील यांनी सांगितले की जळगाव साठी आजपर्यंतच्या रेल्वेमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या परंतू पूर्तता केली नाही अमळनेर धुळे लाईनचे सर्वेक्षण झाले आहे. चाळीसगाव औरंगाबाद रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले आहे परंतु मंजुरी मिळत नाही. जळगाव मोठे औद्योगिक शहर आहे येथून रोज50 कंटेनर जातात मात्र माल साठविण्यासाठी पुरेसे स्टोरेज नाहीत त्यामुळे भादली पाळधी येथे सुविधा उपलब्ध करावी तसेच जळगाव मनमाडसाठी तिसरी लाईन टाकण्यात यावी यावेळी हीना गावित यांनी नागपूर मुंबई व्हाया नंदूरबार मार्गे तसेच नंदुरबार पुणे रेल्वे सुरु करण्याची मागणी केली.

225 सिमेंट बंधार्‍यांचे लोकार्पण
शेतकर्‍याची खरी गरज म्हणजे पाणी आहे ही गरज ओळखून जिल्ह्यातील 225 सिमेंट बंधार्‍यांचे यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे, रोजगार हमी व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल व श्रीमती प्रभू यांच्या हस्ते अनुक्रमे जामखेली, मदारी नाला, सूर नदी, वाघी नदी, टेंभे येथील सिमेंट बंधार्‍यांचे लोकार्पण करण्यात आले, तर देशबंधू ण्ड मंजू गुप्ता फाऊंडेशनच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.यावेळी विविध महिला बचत गटाच्या महिला व शेतकरी याठिकाणी उपस्थित होते. यावेळी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची नांदी झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. लाभार्थी शेतकर्‍यांनी या संस्थेकडून मिळणार्‍या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले.