रेल्वेमध्ये ४ लाख नोकर भरतीची घोषणा म्हणजे चुनावी जुमला-पी. चिदंबरम

0

नवी दिल्ली –काल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेमध्ये नव्याने ४ लाख नोकर भरतीची घोषणा केली. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पियुष गोयल यांनी केलेली ही नोकरभरतीची घोषणा म्हणजे ‘आणखी एक चुनावी जुमला’ असल्याची टीका चिदंबरम यांनी केली आहे. पाच वर्ष काहीही न करणाऱ्या सरकारला अचानक रिक्तपदे भरण्यासाठी आता जाग आली आहे, असा खोचक टोला चिदंबरम यांनी लगावला आहे. चिदंबरम यांनी ट्विट करत सरकारवर आरोप केले आहे.

भारतीय रेल्वेत सध्या एक लाख ३२ हजार कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. येत्या दोन वर्षामध्ये एक लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या दोन वर्षात एकूण ४ लाख पदांची नोकर भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री गोयल यांनी दिली होती.