रेल्वेरूळावर आढळला तरूणाचा मृतदेह

0

जळगाव – साकेगाव आणि नशिराबाद दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गोदावरी मेडीकल महाविद्यालयाजवळ असलेल्या रेल्वे पटरीजवळ तरसोद येथे राहणार 28 वर्षीय तरूण रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, ज्ञानेश्वर दिलीप राजपूत (वय-28) रा.सुसरी ता.यावल ह.मु.तरसोद ता.जळगाव हे आज सकाळी गोदावरी मेडीकल महाविद्यालयाजवळी रेल्वे पटरीजवळ रेल्वेखाली आल्याने मयत स्थितीत आढळून आले. सायंकाळी पत्नीसोबत सुसरी गावाला जाण्यासाठी सायंकाळी 6 वाजता तरसोदवरून निघाले होते. त्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास पत्नी घरी आली मात्र ज्ञानेश्वर राजपूत घरी आले नव्हते. अशी माहिती मयत ज्ञानेश्वर राजपूत यांचे वडील दिलीप राजपूत यांनी सांगितले. रेल्वेतून प्रवास करतांना खाली पडले की रेल्वेखाली आत्महत्या केली असे मरणाचे कारण अद्याप समजू शकले नाही. सोबत असलेल्या बॅगेतील अधारकार्डवरून मयताची ओळख पटली. मयत ज्ञानेश्वर हा कृउबा समितीत बारदान शिवण्याचे काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ आणि दोन मुले असा परीवार आहे. याबाबत नशिराबाद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.