जळगाव। मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सुशिक्षीत तरूणांना रोजगार न देताच रेल्वेमध्ये अॅप्रंटिस करणार्या हाजारों प्रशिक्षणार्थींना नोकरीपासून वंचीत ठेवून बेरोजगारीच्या दरीत ढकलल्याचा आरोप ऑल इंडिया अॅक्ट अप्रेन्टिस महाराष्ट्र अध्यक्ष भरत परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केला. या सर्व अॅप्रेटिंस करणार्या प्रशिक्षणार्थ्यांना 21 जून 2016 साली केलेल्या 20 टक्के आरक्षण कायद्यातून वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे.
हेतूतः नोकरीपासून ठेवले वंचीत
सन 2010 ते 2016 या चार वर्षांत रेल्वेला देशभरातून 2 लाख 50 हजार लाख सेप्टी क्यटेगिरीच्या जागा असूनसुद्धा भारतात रेल्वे प्रशिक्षणार्थी असे 20 हजार तरूणांना प्रशासन नोकरीपासून वंचीत ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला. सेंट्रल रेल्वे, गोरखपुर, अम्बालामध्ये 2016 पर्यंत प्रशिक्षण घेतलेल्यांना 100 टक्के भरती करण्यात आलेली आहे. मात्र, रेल्वे बोर्ड व शासनाने 21 जून 2016 साली नवीन कायदा करून 20 टक्के आरक्षणाची अट घातली आहे. रेल्वेमंत्री व प्रशासनाने नोकरीत समावून घ्यावे.
‘जीआर’कडे होतेय दुर्लक्ष
अशा प्रकारचे आरक्षण आणून रेल्वेमंत्री सुरेश प्रभु प्रशिक्षणार्थींच्या भविष्याशी खेळत आहे. या प्रशिक्षणार्थींनी रेल्वेमुंत्री सुरेश प्रभु व पंतप्रधान नरेंद्र मोदी हा कायदा त्या तारखेच्या पुढे लागू करावा अशी मागणी केली आहे. शासकीय जीआर हा पास होतो त्याच्या पुढच्या तारखेलाचा लागू होतो असा दावा यावेळी करण्यात आला. रेल्वे प्रक्षनार्थ 1 ते 2 वर्ष प्रशिक्षण घेवून परीक्षा पास होवून त्यांच्याकडे प्रमाणपत्र असून सुद्धा प्रशासन त्यांना जबरदस्तीने परीक्षेला बसण्यासाठी भाग पाडत आहे. मानसिक तणावामुळे आजपर्यंत 100 मुलांनी आत्महत्या केली आहे.
दिल्लीत करणार आंदोलन
सर्व प्रशिक्षणार्थी दिल्ली येथे 10 ऑगस्ट रोजी चेतावणी आंदोलन करणार आल्याची माहिती परदेशी यांनी दिली. याप्रसंगी संदिप सातदिवे, शेखर पाटील, योगेश पाटील, विवेक पाटील, सलमान खान, कोमल घुले, सुजाता देवकर, प्रविण पाटील, योगेश ठाकूर, संदिप साकरे आदी उपस्थित होते. नियोजीत चेतावणी आंदोनलनात राज्यभरातील अॅप्रेंटीसधारक तरुण सहभागी होणार आहेत.