रेल्वे ईसीसी बँकेची 26 जूनला निवडणूक

0

11 पर्यंत माघारीची मुदत ; 1550 उमेदवार रींगणात

भुसावळ- दी सेंट्रल रेल्वे एम्प्लॉइज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीची (ईसीसी) पंचवार्षिक निवडणूक 26 जून रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी एक हजार 900 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून छाननीअंती 350 अर्ज अवैध ठरल्याने एक हजार 550 उमेदवार निवडणूक रींंगणात आहेत. 11 जून या माघारीच्या मुदतीनंतर एकुण 35 जागांवरील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 9 एप्रिल ते 3 मे पर्यंत उमेदवारी दाखल करण्याच्या मुदतीत एक हजार 900 उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान, 26 जून रोजी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार असून 27 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

भुसावळ विभागात एकूण 187 जागांसाठी निवडणूक
ईसीसी सोसायटीच्या 35 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत भुसावळ येथील 17, बर्‍हाणपूर, खंडवा मिळून तीन, नाशिक तीन, मनमाड चार, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, बडनेरा व मूर्तिजापूर येथे प्रत्येकी एक तर अकोला येथे तीन अश्या 35 जागांसाठी विभागात मतदान होणार आहे. भुसावळ विभागात 35, पुणे येथे 11, मुंबई येथे 80, सोलापूर 14 व नागपूर 23 असे सर्व मिळून 187 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.के.बियाणी काम पाहत आहे.