रेल्वे उत्पन्नाचा अभाव : भुसावळ विभागातील तीन स्थानकांवर गाड्यांना थांबा रद्द

0

कोहदडसह मांडुरा व शिराला रेल्वे स्थानकाचा समावेश : प्रवाशांची होणार गैरसोय

भुसावळ- रेल्वेला अल्प उत्पन्न मिळत असल्याने भुसावळ विभागातील तीन स्थानकांवरील पॅसेंजरचा थांबा 11 जुलैपासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. भुसावळ विभागातील खंडवा स्थानकाजवळील कोहदड तर मूर्तीजापूर स्थानकाजवळील मांडुरा व चांदूरबाजार स्थानकाजवळील शिराला येथील रेल्वे थांबा रद्द करण्यात आला आहे. रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी या स्थानकांवर मिळणार्‍या उत्पन्नाची माहिती घेतल्यानंतर रेल्वेला अपेक्षित प्रतिसाद उत्पन्न व तिकीटांची विक्री होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळवण्यात आले आहे. तीनही स्थानकांवर पॅसेंजर यापूर्वी थांबत होत्या मात्र 11 जुलैपासून त्या आता या स्थानकांवर थांबणार नसल्याने त्या भागातील रेल्वे प्रवाशांची काहीशी गैरसोय होणार आहे.