रेल्वे कर्मचार्यांची दिवाळी होणार गोड : 18 हजार रुपये बोनस जाहीर
भुसावळ विभागातील एकूण 15 हजार 249 कर्मचार्यांना मिळणार लाभ
भुसावळ : रेल्वे कर्मचार्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असून दरवर्षाप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने कर्मचार्यांसाठी बोनसची घोषणा केली आहे. यंदा रेल्वे कर्मचार्यांना 78 दिवसांचा 17 हजार 951 रुपये बोनस मिळणार आहे. भुसावळ विभागातील 16 हजार 500 कर्मचार्यांना याचा लाभ मिळेल. दरम्यान, कोविड संकटातही रेल्वे कर्मचार्यांना बोनस जाहीर झाल्याने कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंदाजे 27.37 कोटींची रक्कम बोनसपोटी वाटप केली जाणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. बोनसची रक्कम दसरा व पूजेच्या सुट्ट्यांपूर्वी रेल्वे कर्मचार्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने स्थानिक बाजारातही या माध्यमातून मोठी उलाढाल होणार आहे.
या कर्मचार्यांना बोनसमुळे मिळणार दिलासा
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ट्रॅक मेंटेनर, ड्रायव्हर आणि गार्ड, स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ मदतनीस, नियंत्रक, पॉईंटसमॅन, इतर गट सी कर्मचार्यांना बोनसच्या रकमेचा लाभ दिला जाणार आहे. भुसावळ विभागातील सुमारे 15 हजार 49 नॉन-राजपत्रीत रेल्वे कर्मचार्यांना 78 दिवसांच्या वेतनाएवढी पीएलबी रक्कम दिली जाईल शिवाय प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचार्याला जास्तीत-जास्त देय रक्कम 17 हजार 951 रुपये मिळणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.