नवी दिल्ली- रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा बोनस जाहीर झाला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा फायदा जवळपास १२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.
यातील ठराविक रक्कम दसऱ्याच्या अगोदर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. उर्वरित रक्कम दिवाळीच्या बँक खात्यात जमा होईल. रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांना हा बोनस मिळणार नाही.