रेल्वे खाली आल्याने एकाच मृत्यू

0

चाळीसगाव । चाळीसगाव रेल्वे पुलाजवळ रूळ ओलांडतांना 40 वर्षीय इसमाचा रेल्वे सापडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे पुलाजवळ शिवाजी बाळासाहेब गांगुर्डे (वय-40, रा. नारायणवाडी ता. चाळीसगाव) हे रेल्वे पुल ओलांडत असतांना भुसावळकडून गोवाकडे जाणार्‍या गोवा एक्सप्रेस रेल्वेखाली सापडून कापले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजता घडली. सदरील घटना रेल्वे खांब क्र. 327/34 जवळील अप रेल्वे लाईनवर घडली.