रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी एकवटले विविध संघटना

0

पाचोरा । पाचोरा रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांना थांबा मिळून पाचोरा स्थानक मॉडल स्टेशन होण्यासाठी 26 रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात सहभागी होण्यासाठी तालुकाभरातील विविध समाज संघटना एकवटल्या असून 26 रोजी होणारा मोर्चा हा महामोर्चा म्हणून होणार असल्याचे संकेत मिळत आहे. पाचोरा रेल्वे स्टेशनवर सचखंड एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, अमरावती-मुंबई एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळून पाचोरा स्थानकाला मॉडल स्टेशनचा दर्जा मिळावा, पाचोरा जामनेर रेल्वे लाईनचे नॅरो गेजपासून ब्रॉड गेजमध्ये रूपांतर होवून ती मलकापूर पर्यंत न्यावी, भुसावल येथून नव्याने पुणे व मुंबईसाठी एक एक्सप्रेस व एक पॅसेंजन गाडी सुरू करावी अशा विविध मागण्यांसाठी पाचोरा ग्राहक सेवा संघाचे सरचिटणीस प्रा.डी.एफ.पाटील व त्यांच्या सर्व अनेक ठिकाणी निवेदने पाठविली.

दरम्यान 26 रोजी सकाळी 9 वाजता गांधी चौक ते पाचोरा पिपल्स बँकेपर्यंत शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यासाठी पाचोरा तालुका जनता रेल्वे कृती समितीची स्थापना करण्यात आली. या कृती समितीस पाचोरा तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस, पत्रकार संघ, शेतकरी सेना, वकिल संघटना, रिक्षा युनियन, माळी समाज, डॉक्टर्स आसोशिएशन, मेडीकल असोशिएशन, चौधरी समाज, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, नाभिक समाज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया, व्यापारी आसोसिएशन, ट्रेन पोजिशन लाईव्ह गृप यासारख्या समाज संघटना एकवटल्या असून 26 रोजी होवू घातलेल्या मोर्चात लाखोंच्या संख्येने सामिल होण्याचे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष प्राचार्य डी.एफ.पाटील, कार्याध्यक्ष दिनेश पाटील, प्रसिद्धी प्रमुख नंदकुमार शेलकर यांनी केले आहे.