रेल्वे चहा विक्रीस मज्जाव करीत भुसावळात विक्रेत्याला लुटले

0

मनमाडमधील चौघा संशयीतांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा : मारहाण करीत 15 हजारांच्या रोकडसह चांदीचे ब्रासलेट व मोबाईल लांबवला

भुसावळ- अप वाराणसी-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चहा विक्री बंद करावी, असा दम भरीत मारहाण करून चहा विक्रेत्याकडील 15 हजारांच्या रोकडसह चांदीचे ब्रासलेट व मोबाईल लांबवल्याची घटना 6 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ घडली. या प्रकरणी चहा विक्रेता मोहित महेश सोनी (22, महात्मा फुले नगर, भुसावळ) याच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी पुतली, वसीम खान, अशपाक, सूर्या (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा.मनमाड, जि.नाशिक) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार व त्याच्या साथीदारांना आरोपी 6 रोजी शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ अडवत मारहाण केली तसेच फिर्यादीच्या खिशातील 15 हजारांच्या रोकडसह 23 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, सहा हजार 300 रुपयांचे चांदीचे ब्रासलेट, आधारकार्ड लांबवले. तपास पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंनिस शेख करीत आहेत.