Toddler found dead: Shocking incident in Jalgaon जळगाव : शालमध्ये गुंडाळलेले मृत अवस्थेतील चिमुकला शहरातील शिवाजीनगर भागातील रेल्वे उड्डाणपूलालगत मंगळवारी सकाळी सात वाजता आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती कळताच घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली.
चिमुकल्याची ओळख पटवण्याचे आव्हान
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपूल पुलाजवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास रेल्वे ट्रॅकजवळ चिमुकला मृतावस्थेत आढळून आले. हातापायाला काळा दोरा, शाल, औषधी आणि दूध पिण्याची बाटली असे सर्व बालकाजवळ आढळले आहे.
जळगाव शहर पोलिसांची धाव
घटनेची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी धाव घेतली. चिमुकल्याच्या परीस्थितीवरून तो मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. चिमुकल्याचा मृत्यू कसा झाला, त्याला कुणी फेकले, त्याचे पालक कोण? असे सर्व प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका बोलाविण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.