रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणार्‍यास पकडले

0

भुसावळ । येथील रेल्वेच्या तिकीट आरक्षण केंद्रात बेकायदेशीररित्या रेल्वेचे आरक्षित तिकीटे बनविणार्‍या एकास आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात पकडले आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागिय सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानक आरपीएफ निरीक्षक विनोदकुमार लांजीवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन तिकीट आरक्षण केंद्रात तिकीटांचा काळाबाजार करण्यासाठी भुसावळ येथून राऊरकेला,सोलापूर व वढोदरा साठी तृतिय शयनयान श्रेणीच्या 3 तिकीटांसह सापळा रचून आसिफ जलील मलिक (वय 26, रा.पंचशील नगर) यांस आरपीएफ का.नावेद शेख यांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी आसिफ मलिक विरुध्द भुसावळ स्थानक आरपीएफ ठाण्यात रेल्वे अधिनियम 143 अन्वये गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे. मंगळवार 29 ऑगस्ट रोजी त्यास रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.तपास एएसआय लवकुश वर्मा हे करीत आहे.