रेल्वे निवासस्थान मिळत नसल्याने एडीआरएमच्या कार्यालयासमोर ठिय्या य्या

0

भुसावळ : रेल्वेच्या टीआरडी विभागात नौकरीत असलेले बिपीन उपाध्याय यांना निवासस्थान बदलवून पाहिजे असून निवासस्थान देण्याच्या प्रश्नाकडे वारंवार हेतूपूरस्कर रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने त्यांनी बुधवारी सकाळी 10 वाजता एडीआरएम मनोज सिन्हा यांच्या कार्यालयाच्या बाहेरच ठिय्या मांडला. यामुळे सकाळी कार्यालयात येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष उपाध्याय यांनी वेधून घेतले. यामुळे कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली.
एडीआरएम यांच्या कार्यालयाबाहेर उपाध्याय यांनी ठिय्या मांडल्याची माहिती टीआरडी विभागात कळताच त्या विभागातील कर्मचारी यांनी एडीआरएम यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. उपाध्याय यांची समजूत काढली. याच वेळी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी सुध्दा तेथे दाखल झाले. त्यांनीही अचानक असा प्रकार करणे योग्य नाही, येथून उठा अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते,असे सांगितल्याने उपाध्याय यांच्या सहकार्‍यानीं त्यांना तेथून बसण्यास परावृत्त करीत त्यांना तेथून उठविले. उपाध्याय यांना दिलेले निवासस्थान हे नियमानुसार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.