रेल्वे प्रकल्पांवर ड्रोनची नजर

0

रेल्वे मंत्रालयायाचा निर्णय

नवी दिल्ली : रेल्वेचा भव्य पसारा सांभाळण्यासाठी ड्रोननची मदत घेण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेने देशभरातल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर यास सुरुवात झालेली आहे. पण यापुढे रेल्वे प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी, ट्रॅकची देखभाल कशी चालू आहे हे पाहण्यासाठी आणि रेल्वेच्या इतर महत्वाच्या बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे. यासंदर्भात अधिकृत पत्रक रेल्वेने काढले आहे.

रेल्वेमंत्रालयात दिसणार ग्राऊंड
रेल्वेच्या या उपक्रमांतर्गत मध्यप्रदेशातले जबलपूर पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय या निर्णयाची अंमलबजावणी करणारे पहिले झोनल मुख्यालय ठरले आहे. रेल्वेच्या विविध झोनला ड्रोनचा वापर करण्याचे निर्देश रेल्वेने दिले आहेत. त्यामुळे दिल्लीतल्या रेल्वेमंत्रालयात बसूनही अधिकार्‍यांना ग्राऊंडवर नेमकी काय परिस्थिती आहे हे दिसू शकते. यात्रा, फेस्टिवलनिमित्ताने एखाद्या ठराविक रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढणार असेल तर त्यावेळी कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठीही ड्रोन कॅमेरा वापरण्यात येणार आहे.