भुसावळ – रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यामधील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी काही विशेष जादा रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष रेल्वे गाड्या अशा- 02023 लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर ही गाडी 19 व 21 जुलै रोजी तर 02024 नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 25 व 26 जुलै रोजी धावेल. 01206 नागपूर ते पंढरपूर ही गाडी 20 जुलै रोजी तर 01205 पंढरपूर ते नागपूर ही गाडी 25 रोजी धावणार आहे तसेच 01263 नागपूर ते मिरज ही गाडी 22 रोजी व 01264 ही गाडी मिरज ते नागपूरदरम्यान धावणार आहे. या रेल्वे गाड्यांना भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापुर, शेगाव, अकोला, बडनेरा स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने ईतर रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची संख्या कमी होवून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.