रेल्वे प्रवाशांना दिलासा : दिवाळी काळात हटीया-पुणे व सांत्रागाछी-हापा दरम्यान एक्स्प्रेस धावणार

1

भुसावळ- आगामी सण-उत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हटीया-पुणे व सांत्रागाछी-हापा दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत.

अशा आहेत साप्ताहिक गाड्या
अप 02846 अप हटीया-पुणे ही गाडी गुरुवारी दुपारी 1.45 वाजता हटीयाहून सुटेल. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ व मनमाड या रेल्वेस्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. परतीच्या प्रवासात 02845 डाऊन पुणे-हटिया ही गाडी शुक्रवारी सुटेल. तसेच सांत्रागाछी-हापा दरम्यान शनिवारी 02834 ही विशेष सुरू करण्यात आली असून तिला बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला. परतीच्या प्रवासात 02833 ही विशेष गाडी मंगळवारी हापा येथून सुटेल. रेल्वे प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.