रेल्वे प्रवाशांना दिलासा ; पुणे-काजीपेठ दरम्यान विशेष रेल्वे गाडी

0

भुसावळ- उन्हाळी सुटीमुळे रेल्वे गाड्यांना वाढत असलेली गर्दी पाहता रेल्वे मंत्रालयाने पुणे-काजीपेठ दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी 11 मार्चपासून सुरू झाल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही गाडी दर सोमवारी पुणे येथून रात्री 9.30 वाजता सुटणार आहे. यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांची सोय होणार आहे.

भुसावळ विभागातून धावणार गाडी
पुणे ते काजीपेठ एक्सप्रेस सोमवारी पुणे येथून रात्री 9.30 वाजता सुटल्यानंतर मंगळवारी सायंकाळी 5.50 वाजता काजी पेठला पोहेचल. या गाडीच्या 10 फेर्‍या होणार आहे. तर ही गाडी काजीपेट येथून पुण्यासाठी दर मंगळवारी सायंकाळी सातला सुटणार आहे. ही गाडी पुण्यात बुधवारी सायंकाळी 5.40 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी दौड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर, बल्लारशा, शिरपूर कागजनगर, रामागुडम, पेंडापली या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.