भुसावळ: – उन्हाळी सुट्यांची रेल्वेला होणारी गर्दी पाहता साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 31 मार्च ते 30 जून व 1 एप्रिल ते 1 जुलै दरम्यान दर शनिवारी व रविवारी 04115 व 04116 इलाहाबाद ते एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस धावेल.
30 मार्च ते 29 जून व 31 मार्च ते 30 जून दरम्यान दर शुक्रवारी व शनिवारी 01664 व 01663 हबिबगंज ते धारवार गाडी धावेल. रेल्वे प्रवाशांनी अधिकृत तिकीट काढून रेल्वे प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.