रेल्वे प्रवाशांसाठी उन्हाळी सुटीत विशेष रेल्वे गाड्या

0

भुसावळ :- उन्हाळी सुट्यांमध्ये होणारी रेल्वे गाड्यांना गर्दी पाहता विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहे. 31 मार्च ते 30 जून तसेच 2 एप्रिल ते 2 जुलै दरम्यान दर शनिवारी व सोमवारी 02197-02198 अप-डाऊन जबलपूर-कोईम्बतूर व कोईम्बतूर-जबलपूर तसेच 6 एप्रिल ते 29 जून दरम्यान दर शुक्रवारी तसेच 9 एप्रिल ते 2 जुलै दरम्यान दर सोमवारी अप-डाऊन 02833 व 02834 सांतरागाछी ते हापा व हापा ते सांतरागाछी दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे.

रेल्वे प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा व रेल्वे तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये रेल्वे प्रवाशांना केले आहे.