पाचोरा । रेल्वे प्रवाशी संघटनेतर्फे विविध रेल्वेगाड्यांना थांबा व सुविधा पुरविण्यासह इतर मागण्यासाठी आमदार किशोर पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सुनिल गौड, मिलिंद गायकवाड, युवराज परदेशी, बबलु तोमर, संदिप जैन, मनोहर पाटील, यशवंत पाटील, सुमित न्याती, आबा पाटील, चेतन मुथा उपस्थित होते. पाचोरा रेल्वे स्टेशन वर सचखंड एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस, मुंबई एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, भुसावळहुन पुण्यासाठी दौंड मार्गे एक एक्सप्रेस व एक पसेंजर रोज सुरु करावी, महाराष्ट्र एक्सप्रेसच्या 18 बोग्या ऐवजी 24 बोग्या कराव्यात, भुसावळ ते देवलाली शटला पसेंजर जुन्या वेळेवर चालवावी आदी मागण्यांसाठी पाचोरा रेल्वे प्रवाशी संघटनेतर्फे आमदार किशोर पाटील यांना निवेदन देण्यात आले.